वेळ अमावस्या
काळ्या आईचे आपण काही देणं लागतो
या पवित्र भावनं कर्नाटक आणि
लगतच्या मराठवाड्यातील लातूर,बीड आणि
उस्मानाबाद जिल्ह्यांत दर्श
अमावस्या ही ‘वेळ अमवस्या’ म्हणून
साजरी करण्याची प्रथा आहे.
मुळातील शब्द हा ‘येळी अमावस्या’
असून त्याचे नागरकरण हे ‘वेळ अमावस्या’
झाले.
कर्नाटकात पेरणीनंतर येणारी
सातवी अमावस्या म्हणजे येळी
अमावस्या असते.
लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत वेळ
अमावस्येच्या दिवशी शेतकरी शेतात
पांडवाची पूजा, तसेच काळ्या
मातीची यथासांग पूजा करीत असतो.
या दिवशी सर्वभाज्या एकत्र करून
शिजवलेली भज्जी, ताकाचे अंबिल
आणि ज्वारीचे उंडे हे खास ग्रामीण
पदार्थ नैवेद्यासाठी असतात. गोड
पदार्थ म्हणून गव्हाची खीर असते आणि
तेच जेवण सर्वांना देण्यात येते. आता
नव्याने धपाट्याची भर पडली आहे.
लातूर जिल्ह्यात तर स्थानिक
शासकीय सुटीच असते आणि सर्व दुकाने,
व्यवहार बंद असतात. त्यामुळे गावात
सर्वत्र शुकशुकाट असतो. फुललेले असते ते
फक्त ग्रामीण भागासाठीचे
बसस्थानक.
सर्वलोक शेतात
जेवणासाठी जात असतात आणि
ज्यांना कुठेच जाणे शक्य होत नाही ते
लोक गावातील सार्वजनिक बागेत,
जवळच्या वनराईतल्या मंदिराच्या
ठिाकाणी डबे घेऊन वनभोजनाचा आनंद
लुटतात.
⚫मार्गशिर्ष अमावस्येला सोलापुर जिल्ह्याचा काही भाग, नांदेड, बीड, लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात”वेळा अमावस्या”हा शेतकरी बांधवांचा महत्वाचा सण साजरा केला जातो.
हा सण शेजारील कर्नाटकातुन महाराष्ट्रात आला आहे.
आज09 जानेवारी रोजी हा सण मोठ्या उत्साहात पार पडेल.
ह्या दरम्यान रब्बीचे पिक जोरात असते, शेतकरी बांधव ह्या दिवशी कुटुंबासहीत, मित्र परीवारासह शेतात खोप बांधुन काळ्या आईची पुजा करतात.
नांदेड , बीड , लातुरसारख्या शहरात ह्या दिवशी अघोषीत संचारबंदी असल्यासारखी असते, कलेक्टर डिक्लेअर्ड हॉलीडे असतो. बँकाना वगैरे सुटी नसते पण लोक सकाळपासुनच शेतात गेल्यामुळे काम फारसे नसते. व्यापारी प्रतिष्ठाने व ईतर व्यवहार पुर्णपणे बंद असतात.
नुकत्याच आलेल्या वाटाणा , तुरीचे दाणे घालुन केलेली भाजी ( भज्जी ), तीळ गुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावुन केलेली आंबील, खीर अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो.
उत्तरपुजेचे वेळी गवताच्या पेंड्या पेटवुन शेतात फिरवतात व होलगा , होलगा म्हणतात.होलगा हा शब्द कानडी असावा, पण बहुधा सम्रुध्धी येवु दे असा काहीसा अर्थ असावा.
वेळा अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा.