पाच लाखांच्या रकमेसह ‘एटीएम’ मशीनची चोरी

Loading

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्‍हे येथील ‘आयडीबीआय’ बँकेच्या ‘एटीएम’ मध्ये असलेल्या ४ लाख ९८ हजारांच्या रोख रकमेसह मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेली. चक्क मशीन चोरून नेल्याने उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळ माजली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री १0.२१ ते ८.२५ दरम्यान झाला. 
तिर्‍हे येथील नदीच्या पुलाशेजारी हणमंत सुरवसे यांच्या गाळ्यात ‘आयडीबीआय’ बँकेची ‘एटीएम’ मशीन आहे. या एटीएम मशिनच्या संरक्षणासाठी रात्री सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून अज्ञात चोरटे तिथे आले. चोरट्यांनी पहिल्यांदा एटीएम मशीनच्या गाळ्यात व बाहेर असलेल्या कॅमेर्‍याचे केबल तोडले. त्यानंतर कॅमेरे फोडून टाकले. मशीनचा पासवर्ड उचकटला नंतर खाली असलेले सिमेंटचे फाउंडेशन तोडले. संपूर्ण मशीन हलवून ओढत बाहेर काढण्यात आली. बाहेर असलेल्या अज्ञात वाहनामध्ये मशीन ठेवून ती चोरून नेली. 
सकाळी ८.२५ वा. रस्त्यावर रहदारी वाढली, त्यानंतर एटीएम मशिनच्या गाळ्यासमोर झालेली दुरवस्था पाहून आजूबाजूच्या लोकांना संशय आला. लोकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता आतमध्ये एटीएमची मशीन नसल्याचे लक्षात आले. नागरिकांनी तत्काळ तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, डीवायएसपी अभय डोंगरे, चौगुले, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोसले हे तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी तत्काळ श्‍वान पथकाला पाचारण केले. श्‍वान पथक जवळच असलेल्या ५00 मीटरवरील आयडीबीआय बँकेजवळ गेले आणि तेथे घुटमळले. हा प्रकार कळताच इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँन्ड सर्व्हिसेस प्रा. लि. मुंबईचे एटीएम चॅनल मॅनेजर रविनारायण इंजामुरी (वय २७, रा. कुचननगर) हे तेथे आले, त्यांनीही पाहणी केली. रविनारायण इंजामुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे हे करीत आहेत. (एटीएम’ मशीनच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मशीनसह रोख रकमेची चोरी हा गंभीर प्रकार असून याबाबत तत्काळ तपास सुरू केला आहे. यात संपूर्ण चौकशी होऊन संबंधित आरोपींना अटक केली जाईल

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *