डॉक्टरांचा चुकीमुळे तरुणाला गमवावा लागला पाय

Loading

12 जानेवारी : डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे एका रुग्णाला आपला एक पाय कापुन, कायमच अपंगत्व पत्कारावं
लागल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीये. याहुनही संतापजनक बाब म्हणजे निष्काळजी करणार्‍या 3 डॉक्टरांना परस्पर निलंबित करून ,रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांनी केलेलं पाप झाकन्याचं दुष्कृत्य करत हे प्रकरण दड़पण्याचा प्रयत्न केल्याचं हे आता उघड झालं आहे.
बाळासाहेब देंडगे,काही दिवसांपूर्वीच आपल्या दोन्ही पायावर उभा राहु शकणारा हा तरुण आज मात्र कायमचा अपंग होऊन बसलाय.
शरीरातील मास पेशींना जटिल बनवणारा”व्हेरिकोज व्हेन”या आजाराच्या उपचारासाठी, बाळासाहेब चार महिन्यापूर्वी यशवंतराव चव्हाण शासकीय रुग्णालयात  दाखल झाला होता. एका छोट्या शस्त्रक्रियेनंतर त्याचा आजार बरा होणं अपेक्षित होतं, मात्र झालं उलटच शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी पायाला रक्तपुरवठा करणारी मुख्य नस कापली आणि त्यामुळे निकामी झालेला पाय कापवा लागला आणि या धडदाकट दिसणार्‍या तरुणाला कायमच अपंगत्व आलं.
धक्कादायक बाब म्हणजे हां सगळा प्रकार रुग्णालय प्रशासनाला कळला होता. मात्र, तो उघड करण्याऐवजी संबंधित डॉक्टरांना निलंबित करुन हे प्रकरण परस्पर रफा-दफा करण्याच्या गुन्हा प्रशासनाकडून केल्या गेला. डॉक्टरांच्या एका चुकेन आपला संसार उघड्यावर पडला. त्यांची नुकसान भरपाई देणं तर दूरच मात्र कुणी साधी दखल ही घेतली नाही. बाळासाहेबाच्या आधारावर त्याचे वृद्ध आई -वडील ,पत्नी आणि 3 मुलींच भवितव्य अवलंबून आहे.
खाजगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने शेकडो गरीब रुग्ण अशा रुग्णालयात दाखल होतात. मात्र, कधी त्यांचे अवयव विकुन तर कधी नव सिख्या डॉक्टरांना प्रयोग करण्यासाठी म्हणून या रुग्णाची अक्षरशः हेळसांड केली जाते. बाळासाहेब याच प्रकाराला बळी आहे.
या तरुणाला असं अकाली अपंगत्व देणार्‍या डॉक्टर आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्‍यावर कठोर कारवाई करून सरकार माय-बापाचा आधार देणार का ?हाच खरा प्रश्न आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *