Pandharpur Live News : “सीर्फ हंगामा खडा करना मक्सद नही मेरा, कोशिश ये है की ये सूरत बदलनी चाहिए” असा डायलॉग मारुन श्रीविठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते व माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
आम्ही राष्ट्रवादी च्या बाजुला होतो तेंव्हाही प्रामाणिक होतो, त्या काळात आम्ही तुम्हाला कधीही भेटलो नाही. आणि आता तुमच्यासोबत आलो आहोत तर तुमच्या बाजुलाही प्रामााणिक राहू. आत एक आणि बाहेर एक असे करणार नाही. आमच्या भागातून जास्तीत जास्त मतदान देऊ, आपण जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासा तडा जाऊ देणार नाही, असा शब्द विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पार पडलेल्या जाहीर सभेत दिला.
राज्य सहकारी बॅंकेच्या कारवाईनंतर आम्ही मदत मागण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो. त्या वेळी आम्ही लोकसभेला मदत करण्याचा शब्द तुम्हाला दिला होता. त्यावेळी आम्हाला मदत करणार असाल, तर पुढच्या हंगामापर्यंत कारखान्याचे सर्व विषय जसे की व्याजाची सवलत, एनसीडीसीच्या माध्यमातून मदत करू, असा शब्द आपण दिला होता त्यामुळे आता कारखान्याबाबत निश्चिंत झालो आहे. असंही यावेळी अभिजीत पाटील म्हणाले. विठ्ठल साखर कारखान्यासाठी आपण सढळ हाताने मदत करावी, कारखान्याला जीवदान द्यावं. सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे रहावं अशी विनंतीही अभिजीत पाटील यांनी यावेळी फडणवीस यांना केली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला विधानसभेचे तिकिटही जाहीर झालं होतं. त्यामुळे मला आमदार झाल्यारखं वाटायचं, असं मी भाषणातही म्हटलं होतं. आता आमदारकी डावावर लागली तरी चालेल; पण कारखाना वाचायला पाहिजे, अशी भूमिका मी घेतली असून सभासदांच्या विश्वासाशी प्रामाणिक राहण्याचा शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन असंही अभिजीत पाटील म्हणाले.
महायुतीचे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुक्रमे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. या सभेला आमदार शहाजी पाटील, महादेव जानकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शिवाजी सावंत यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.Abhijeet-Patil-Suport-BJP