सोलापूर :-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक विभागाच्यावतीने सखी मतदान केंद्र, आदर्श दिव्यांग मतदान केंद्र, आदर्श महिला मतदान केंद्र, आदर्श युवा मतदान केंद्र याचबरोबर आदर्श मतदान केंद्र ही संकल्पना राबविल्यामुळे मतदार आकर्षित होऊन मतदानाचा हक्क बजाविला आहे. 42 सोलापूर लोकसभा मतदार संघातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील दिव्यांग मतदारांसाठी स्थापन केलेले आदर्श दिव्यांग मतदान केंद्र हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील आदर्श दिव्यांग मतदान केंद्राची स्थापना केली. या मतदान केंद्रात रॅम्प, व्हीलचेअर, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष, कमोडसह स्वतंत्र प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, उष्मघातापासून वाचण्यासाठी सूचना फलक, आरोग्य सुविधा,पुरेशी प्रकाश व्यवथा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, महिला दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी महिला स्वयंसेवक, कुलर आधी आवश्यक सुविधा देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व मतदार संघात दिव्यांग कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. या मतदान केंद्रात त संपूर्ण व्यवस्थापन दिव्यांग कर्मचा-यांनी केले होते.
जिल्ह्यात सोलापूर-42 (अ.जा.) व माढा-43 लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार दिनांक- 07 मे 2024 रोजी मतदान पार पडले.जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आर्शीवाद यांच्या मार्गदर्शनखाली जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी तसेच अन्य प्रशासकीय यंत्रणेने मतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अथक परिश्रम घेतले.