👁 10 Views

जिल्ह्यात तीन लाख बालकांना आधार

नगर – जिल्ह्यातीलशून्य ते सहा वयोगटातील लाख १५ हजार ४६ बालकांची आधार नोंदणी झाली आहे. तथापि, अजूनही ३१ हजार ५०७ बालकांची नोंदणी झाली नसल्याची बाब समोर आली. राहिलेल्या बालकांचे आधारकार्ड काढावे, असे आवाहन महिला बालकल्याण समितीच्या सभेत करण्यात आले. कुपोषितांची संख्या शुन्यावर आणण्याबाबतही ठराव घेण्यात आला.
महिला बालकल्याण समितीची सभा शुक्रवारी सभापती अनुराधा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य सुनीता भांगरे, अॅड. रोहिणी निघुते, मीरा शेटे, राणी लंके, पुष्पा रोहोम, अनसूया होन, मनीषा ओहोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील बालकांचे अाधारकार्ड क्रमांक घेण्याचे आवाहन प्रशासनाने यापूर्वीच केले आहे. त्यानुसार ग्रामीण भागात शाळास्तर, तसेच अंगणवाड्यांत बालकांना घेऊन येण्यासाठी पालकांना सूचना दिल्या जात आहेत. जिल्हा परिषदेला आधार नोंदणीचा दैनंदिन अहवाल सादर केला जातो. जिल्ह्यातील २१ प्रकल्पस्तरांवरून तशी माहिती संकलित करण्यात आली आहे. सध्या हजार ५०० अंगणवाड्यांमध्ये लाख ४६ हजार ५५३ विद्यार्थी शून्य ते सहा वयोगटातील आहेत. त्यापैकी लाख १५ हजार ४६ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. अजूनही ३१ हजार ५०७ बालकांचे आधारकार्ड काढणे बाकी आहे. शून्य ते सहा वयोगटातील ज्या बालकांची आधार नोंदणी राहिली आहे, अशा बालकांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनालाही उर्वरित बालकांच्या नोंदणीबाबत कळवले असल्याचे महिला बालकल्याण समितीने सांगितले.
या व्यतिरिक्त कराटे प्रशिक्षणासाठी अंदाजपत्रकात वाढीव तरतूद करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. तालुकानिहाय अंगणवाड्यांची सर्वांगीण वस्तुस्थिती पाहण्यासाठी तालुकास्तरावर पुढील बैठकीत बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना बोलावण्याचे ठरले. कुपोषित मुलांचे प्रमाण शुन्यापर्यंत कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना नागवडे यांनी दिल्या. अंगणवाडी बांधकाम दुरुस्ती करताना बांधकाम विभागाने विशेष लक्ष सहकार्य करावे, असा सूर अाळवण्यात आला.
दरम्यान, टंचाईसंदर्भात काही दिवसांपूर्वीच तालुकानिहाय बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता अंगणवाड्यांच्या प्रश्नासंदर्भात बैठका बोलावण्याचे नियोजन सभापती नागवडे यांनी आखले आहे.
तालुकानिहाय बैठका
अंगणवाड्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात तालुकानिहाय बैठका घेण्याचे नियोजन आहे. या बैठकांना अध्यक्ष उपाध्यक्षांनाही उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार आहे. या दौऱ्यात अंगणवाड्यांचे प्रश्न समजून ते मार्गी लावण्यात येतील, असे सभापती अनुराधा नागवडे यांनी सांगितले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *