👁 10 Views

B’day: बुजऱ्या स्वभावामुळे आईने नाटकात दिले काम, आज संपता संपत नाही या मराठी अॅक्ट्रेसची अवॉर्ड लिस्ट

मुंबई – विलक्षण बोलके डोळे आणि सहज अभिनयाच्या जोरावर मुक्ता आज मराठी चित्रपट सृष्टीची आघाडीची अभिनेत्री बनली आहे. नाटक, चित्रपट आणि टी.वी या तिन्ही माध्यामांत सफल अभिनय कारकिर्द घडविणारी मुक्ता ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. अशी सर्वाची लाडकी मुक्ता आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
मुक्ता बर्वे हे नाव जरी घेतले तर डोळ्यासमोर येते ‘जोगवा’मधील सुली, ‘एक डाव धोबीपछाड’ चित्रपटातील अशोक सराफांची नटखट मुलगी आणि तितक्याच ताकदीने’मुंबई-पुणे-मुंबई’

मधील स्वच्छंद, स्वतंत्र विचारांची मॉर्डन मुलगी. भूमिका कोणतीही असो शहरी मुलगी अथवा खेडवळ स्त्री. मुक्ताच्या अभिनयाने ती अक्षरशः त्या व्यक्तिरेखेत प्राणच फुंकते हे कोणीही प्रेक्षक नाकारु शकणार नाही.
17 मे 1981 रोजी पुण्याजवळील चिंचवड गावात मुक्ताचा जन्म झाला. मुक्ताचे वडिलांचे नाव वसंत बर्वे तर आई विजया बर्वे नाट्यलेखिका आणि शिक्षिका. मुक्ताचा मोठा भाऊ देबू बर्वे हा कमर्शिअल आर्टिस्ट आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *