👁 13 Views

बॉलिवूडची आई हरपली..अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन; कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास

मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे आज ( गुरुवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्या 59 वर्षांच्या होत्या. कोकिलाबेनअंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल (बुधवारी) छातीत दुखत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे लग्नानंतर रीमा लागू या नावाने ओळखल्या गेल्या. त्यांच्या निधनाने च‍ित्रपट आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ओशिवरा स्मशान भूमीतदुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत.

रीमा लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ हैं’, ‘वास्तव’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘आशिकी’, यासारख्या सुपरहीट सिनेमांमध्ये त्यांनी दमदार अभिनय केला. त्यांनी तब्बल चार दशके चित्रपट आणि नाट्यसृष्टी गाजवली. त्यांच्या आकस्मित निधनाने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील आई हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

बॉलिवूडमधील आई हरपली…

बॉलीवूडमधील आई म्हणूनही रिमा लागू परिचीत होत्या. ‘कुछ कुछ होता है’ मध्ये काजोलची आई, ‘हम आपके हैं कौन’ मध्ये माधुरी दीक्षितची आई, मैने प्यार किया सिनेमात सलमान खानची आई, यासारख्या दमदार भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.

आईकडून मिळाला मराठी रंगभूमीचा वारसा…

पुणे येथील हुजूरपागा या शाळेत रिमा लागू (नयन भडभडे) यांचे शिक्षण झाले होते. विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेण्यात आली होती. नंतर त्यांनी व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. 70-80 च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले.
रीमा लागू यांचे गाजलेले सिनेमे,मालिका आणि नाटके पुढील स्लाइडवर…

रीमा लागू यांचे गाजलेले सिनेमे
मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, वास्तव, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी
हिंदी दूरदर्शन मालिका
श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं
रीमा लागू यांनी भूमिका केलेली नाटके
घर तिघांचे हवे, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *