👁 9 Views

महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यावर कारवाई कधी? उद्या बीड बंद

बीड | छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि माँ जिजाऊ यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विठ्ठल तिडकेवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या (दि. २२ मे.) बीड बंदचं आवाहन करण्यात आलंय. मराठा क्रांती मोर्चाच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन यासंदर्भातील पत्रक प्रकाशित करण्यात आलंय.

पवन नंदा भास्कर यांनी फेसबुकवरुन पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. विठ्ठल तिडकेने पवन यांना फोन करुन महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी विठ्ठल तिडकेवर गुन्हे दाखल झालेत, मात्र तो सध्या फरार आहे. दरम्यान, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप पुढे पाठवू नये, असं आवाहन करण्यात येतंय.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *