👁 9 Views

प्राचार्य खडतरे आत्महत्येप्रकरणी सांगोला येथील युवा सेनेच्या ९ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल..! सांगोल्यातल्या शैक्षणीक क्षेत्रातील खडतरेंनी गोपाळपूर येथील स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरींग कॉलेजमध्ये येऊन आत्महत्या का केली..? गुढ कायम..!!!

पंढरपूर Live 21 may2017

सांगोला येथील एका शैक्षणीक संस्थेचे प्राचार्य खडतरे यांचे आत्महत्येप्रकरणी फिर्यादी – अनिल रामदास खडतरे रा. खडतरे गल्ली, सांगोला जि. सोलापुर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सांगोला येथील युवा सेनेचे कार्मकर्ते 1) मधुकर बनसोडे, 2) तुषार इंगळे, 3) अनिल निंबाळकर, 4) तानाजी गोडसे, 5) सौरभ चव्हाण 6) विनायक माळी, 7) अमर सांळुखे, 8) सागर चव्हाण, 9) गुंडा खटकाळे सर्व रा. सांगोला
यांचेवर भा.द.वि.306,34 सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम चे दुरूस्ती विधेयक 2014चे कलम 3(1) (S),3(1) (R)ना.ह.सं. 7(1) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 21/05/17 रोजी सकाळी 09/30 चे दरम्यान सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य दिलीप खडतरे यांनी गोपाळपूर येथील
स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरींग कॉलेजचे चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी कळताच जिल्ह्यातील
शैक्षणीक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान मयत खडतरे यांच्या तोंडाला काल सांगोला येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. परंतु मयत खडतरे यांनी सांगोल्याहून येऊन गोपाळपूरच्या स्वेरीत आत्महत्या का केली..? याबाबत चे गुढ अजुन गुलदस्त्यातच आहे..! पोलीस तपासात ते निष्पन्न होईपर्यंत तरी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात याबाबतीत विविध तर्क वितर्कांना उधाण आल्याचे चित्र आहे.

पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की, दि. 20/05/17 रोजी सकाळी 11/00 वा.चे सुमारास मयत खडतरे यांनी त्यांचे शाळेमधील त्यांचे शाळेमधील मुलींशी गैरवर्तन केल्याचे कारणावरून वरील युवासेनेचे कार्यकर्ते यांनी दिलीप खडतरे यांना केबिनमधून बाहेर ओढून कॉलेजसमोरील रोडवर आणून त्यांचे अंगावर डिझेल व ऑईल ओतून त्यांना ,तुम्ही तुमच्या शाळेतील मुलींशी गैरवर्तन करता काय तुम्हाला जिवंत सोडणार नाही. असे म्हणून त्यांना जातीवाचक शिवीगाळी करून मारहाण करून दमदाटी केली व विनयभंग केलेबाबतची तक्रार दिल्याने नाहक बदनामी झाल्याचे कारणावरून दिलीप खडतरे हे वैफल्यग्रस्त होऊन आज रोजी गोपाळपूर येथे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरींग कॉलेजचे चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

वरील आरोपींनी दिलीप खडतरे यांना आत्महत्या करणेस प्रवृत्त केले असल्याचा गुन्हा नोंद झाला असुन अधिक तपास पोलीस निरी. सांगोला यांचेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

काय आहे प्राचार्य खडतरेंच्या सुसाईड नोटस् मधील मजकूर…? बघा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *