‘या’ श्रीमंत अभिनेत्याच्या प्रेमात होती अभिनेत्री माधुरी दीक्षित

Loading

Pandharpur Live News Online : सुप्रसिद्ध माधुरी दीक्षित हिचा आज वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीच्या चर्चा रंगल्या आहेत. , ‘दिल’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. डॉक्टर श्रीराम नेने याच्यंसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं होतं. अभिनेत्रीने विवाहित आणि एका मुलीचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट केल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता.

दोघांच्या नात्याच्या चर्चा देखील फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर, चाहत्यांमध्ये देखील रंगल्या होत्या. ज्या अभिनेत्यासोबत माधुरी हिच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या तो अभिनेता इतर कोणी नाही तर संजय दत्त हा होता.

संजय दत्त आणि माधुरी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम देखील बहरलं… असं अनेकदा सांगण्यात देखील आलं..

एकत्र सिनेमांमध्ये काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं असं देखील सांगण्यात आलं. रिपोर्टनुसार, ‘खलनायक’ सिनेमात संजय दत्त, माधुरी दीक्षित यांच्यासोबत अभिनेते जॅकी श्रॉफ देखील होते. सिनेमाची शुटिंग सुरु असताना माधुरी आणि संजय दत्त यांच्या रिलेशनशिपच्या देखील चर्चा रंगत होत्या.संजूबाबा आणि माधुरी यांच्या नात्याची चिंता दिग्दर्शकांना सतावत होती. 

सिनेमाच्या शूटिंगदरम्यान माधुरी आणि संजय यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असता तर, त्याचा वाईट परिणार सिनेमाच्या कथेवर झाला असता… अशी भीती सुभाष घाई यांना होती. कारण सिनेमात दोघे एकमेकांच्या शत्रूच्या भूमिकेत दिसणार होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुभाष घई यांनी एक करार केला आणि हा करार संजय दत्त आणि माधुरी दीक्षित या दोघांनी देखील मान्य केला. सिनेमा पूर्णपणे तयार होऊन प्रदर्शित होईपर्यंत दोघेही एकमेकांशी लग्न करणार नाहीत, असे या करारात स्पष्ट लिहिलं होतं. कारण दोघांचं लग्न झालं असतं, तर त्याचा फटका सिनेमाला बसला असता.. लोकांचं लक्ष दिग्दर्शकांना माधुरी दीक्षित आणि संजय दत्तकडे वळवायचे नव्हतं.

पण दोघांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने अमेरिकेत जाऊन डॉक्टर श्रीराम नेने याच्यंसोबत लग्न केलं. आज अभिनेत्री तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *