सैफ अली खान – करीना कपूर यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Loading

 

बॉलिवूडच्या पॉपुलर कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर… अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आणि लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सैफ आणि करीना यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

दोघांनी फार कमी लोकांच्या उपस्थितीत 2012 मध्ये लग्न केलं. पण आता लग्नाच्या 13 वर्षांनंतर करीना आणि सैफ यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सांगायचं झालं तर, नुकताच, सैफ आणि करीना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्यामध्ये दोघे बिल्डिंग खाली लिपलॉक करताना दिसले. ज्यामुळे दोघांना नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केलं. पण आता सैफ आणि करीना यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.


त्यामागे देखील मोठं कारण आहे. सोशल मीडियावर सैफ याचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सैफ आणि करीना यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकताच सैफ याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा सैफ याच्या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधलं.


सैफ याच्या हातावर पत्नी करीना हिच्या नावाचा टॅटू होता. पण आता अभिनेत्याच्या हातावर दुसराच टॅटू दिसत आहे. अभिनेत्याच्या टॅटूचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नेटकरी देखील व्हायरल होत असलेल्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.


पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आणखी एका लग्नाच्या तयारीत…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नवाब सैफ तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…’, तिसरी नेटकरी म्हणाला, ‘घटस्फोट होणार पक्क आहे…’, चौथा नेटकरी म्हणतात, ‘आता टॅटू बोलला आहे, काही दिवसांनी पत्नी बदलेल…’, अन्य नेटकरी म्हणाला, ‘सैफ हॅट्रिक मारण्यासाठी तयार आहे…’ सध्या सर्वत्र फक्ता आणि फक्त सैफ – करीना यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.


सैफ अली खान – करीना कपूर अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट झाल्याच्या अनेक वर्षांनंतर सैफने अभिनेत्री करीना हिच्यासोबत लग्न केलं. खास पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहे. तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *