पंढरपूर: सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा इ. १० वी निकाल आज जाहीर झाला. यामध्ये पंढरपुर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील ६२ पैकी ४४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर इतर विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. प्रशालेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक कृष्णा अमर मकर ९६.२०% द्वितीय क्रमांक कैवल्य आनंद बडवे ९४.00% आणि तृतीय क्रमांक समृद्धी काकासाहेब पवार ९३.८०% श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या सुत्रबद्ध नियोजनामुळे व कर्मयोगी शैक्षणिक प्रणालीमुळे प्रशालेच्या इ.१० वीचा १००% निकाल लावून घवघवीत यश संपादन केले. ही निकालाची परंपरा कर्मयोगी विद्यानिकेतन कायम ठेवणार याची मी ग्वाही देतो. – श्री. रोहन परिचारक
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चीफ ट्रस्टी माननीय श्री रोहनजी परिचारक, प्रशालेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई व संस्थेचे रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी केले. तसेच यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील हजर होते.या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.