👁 19 Views

गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे गुरुपौर्णिमा होय – शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत

गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे गुरुपौर्णिमा होय – शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत

कोंढवे धावडे – श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरु पौर्णिमेचा सोहळा महिला भगिणींच्या हस्ते स्वामींची आरती व अन्नदान करत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रसाद बोडके व संस्थापक डॉ. गणेश राऊत यांनी केले होते.
यावेळी सर्वांची संकटे दूर करून सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी गुरुप्रमाणे स्वामी आपण उभे राहावे अशी प्रार्थना करण्यात आली.


अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे आयुष्याला योग्य दिशा व मूल्य देणारे आयुष्याच्या टप्प्यावर वरती भेटलेले सर्व आपले गुरु असतात, प्रथम गुरु आई वडील त्यानंतर शिक्षक आणि आपल्याला जो घडवतो ते सर्व गुरुजन यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुविण ज्ञान नाही गुरु विना प्रगती नाही आपल्यातील उपजत गुणांना पैलू यशाच्या शिखराला आणि शिखरावर नेणाऱ्या प्रत्येकाला शतशः नमन असे मत शिवभक्त, संस्थापक , साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रसाद बोडके, विजय धावडे, प्रशांत महाजन, अरुण तुपे, अविनाश पिंगळे, बंटी दळवी, संजीवनी ताई दळवी,प्रभाताई बोडके, गौरीताई धावडे, राजश्रीताई पालव, भावना निवंगुणे, अमिताताई राऊत कोमल ताई जांभुळकर, प्रियंकाताई शिवशेट्टी व इतर स्वामीभक्त उपस्थित होते..
स्वामीभक्त प्रसाद बोडके यांनी सर्वांचे आभार मानले..

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *