“सिलिकॉन कॉम्प्युटर्सचे संचालक श्री. राजेश विभुते सर यांना व्यावसायिक सेवा पुरस्कार प्रदान”

“सिलिकॉन कॉम्प्युटर्सचे संचालक श्री. राजेश विभुते सर यांना व्यावसायिक सेवा पुरस्कार प्रदान”

पंढरपूर :
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर तर्फे आयोजित व्यावसायिक सेवा पुरस्कार सोहळ्यात सिलिकॉन कॉम्प्युटर्सचे संचालक श्री. राजेश नाथा विभुते यांना “व्यावसायिक सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
माजी शिक्षक आमदार मा.दत्तात्रय सावंतसर यांच्या शुभहस्ते व रोटरी पंढरपूर चे अध्यक्ष डॉ. वैभव सादीगले, सेक्रेटरी श्री मयूर परीचारक, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.कारंडे सर, पंढरपूर अर्बन बँकेच्या संचालिका डॉ. संगीता पाटील मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी भवन इथे सन्मान प्रदान करण्यात आला.
गेल्या २५ वर्षांपासून संगणक शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करत २०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे. डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता पाटील यांनी केले जे अत्यंत प्रभावी व आकर्षक होते. संपूर्ण कार्यक्रम नेटक्या आणि सुंदर नियोजनातून पार पडला. रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीची आणि सेवा कार्याची झलक या सोहळ्यात प्रकर्षाने जाणवली.
श्री. विभुते सर यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत रोटरीच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमास रोटरी क्लब पंढरपूर चे सर्व सदस्य, व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *