पद्म पुरस्कार्थींचा ‘गौरव सत्कार सोहळा’ संपन्न…

पद्म पुरस्कार्थींचा ‘गौरव सत्कार सोहळा’ संपन्न…

“अंबादास टल्लु फाउंडेशन,” च्या वतीने घेण्यात येणारे पद्म पुरस्कारार्थीच्या सत्कार सोहळ्याचे हे सलग सहावे यशस्वी वर्ष आहे, त्यामुळे ‘आता हा कार्यक्रम केवळ एक इव्हेंट न होता, या वेळेपासून ती एक मुव्हमेंट ठरावी’… या संकल्पनेनुसार
‘संवाद आणि छोटी मुलाखत’ या स्वरूपात या गौरव पुरस्कार्थी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला मराठी लेखक आणि अँकरिंग करणारे, सर्वांना सुपरिचित असे श्री दीपक प्रभावळकर यांनी सर्वांचे एकत्रितपणे मुलाखत घेण्याचे काम उत्कृष्ट केले सर्व पद्म पुरस्कारार्थींना प्रश्न विचारून त्यांचे व्यक्तिमत्व अलगदपणे यशस्वीरीत्या प्रेक्षकांसमोर उलगडले. उपस्थित सर्व प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध या शेवटपर्यंत कार्यक्रमाचा ऐकत अनुभवत होते .


” अंबादास टल्लू फाउंडेशन ” चे मुख्य मार्गदर्शक व सल्लागार, पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या अभिभाषणात आपला संघर्षमय पण यशस्वी जीवन प्रवास उलगडून दाखवला. त्याचप्रमाणे, याप्रसंगी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात ते म्हणाले की, ” अंबादास टल्लू फाउंडेशन ही संस्था शिक्षणाने आरोग्य या विषयावर सुद्धा काम करते परंतु समाजात आरोग्याशी निगडित अशा कितीतरी बाबी असतात. पुण्यातील एका सर्वेक्षणानुसार गाव खेड्यातील मुले कुपोषित , अशक्त असतील असे आपल्याला आजवर वाटत होते परंतु एका पुण्यातील सर्वेक्षणानुसार असे आढळून आले की, शहरी भागातही 60% विद्यार्थी हे कुपोषित आहेत. यावर काम करण्याची निश्चितच गरज आहे.” पद्मपुरस्कारार्थी आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ कामगिरी करतात. त्यांचा गौरव ही नक्कीच आनंदाची बाब आहे. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते.


‘अंबादास टल्लू फाउंडेशनच्या’ या आगळ्यावेगळ्या, आव्हानात्मक व अतिशय मौलिक विचारधारे नुसार सातत्याने सूरु असलेल्या कार्यक्रमाचे त्यांनी जाहीर कौतुक केले. अशा कार्यक्रमामुळे आज सर्वत्र पद्म पुरस्कारार्थींच्या सत्काराच्या कार्याची दखल सर्वजण घेत आहेत, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे , असे म्हणत अंबादास टल्लू फौंडेशन ला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व पद्मा भूषण डॉक्टर शां ब. मुजुमदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ” टल्लू फाउंडेशन च्या अनुराधाताई यांचे अभिनंदन करतो. हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. पदम पुरस्कार मिळणे ही फार मोठी बाब आहे. 1कोटी लोकसंख्ये मागे 1 जनाला पुरस्कार मिळतो।।।ही भारतातील एकमेव संस्था आहे,,,संस्थेचे काम मला खूप भावले,,,,मोठेपणाला दाद देण्यासाठी संस्थेचे मन ही मोठे आहे. मी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याची हमी देतो ” असे प्रतिपादन केले .


अंबादास टल्लू फाऊंडेशन त्या सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध पद्म पुरस्कार प्राप्त थोर व्यक्तींचा गौरव यापूर्वी पद्म पुरस्कार मिळालेल्या थोरांच्या हस्ते करण्यात आला. हा समारंभ कॉसमॉस ऑडिटरियम गणेश खिंड रोड येथे संपन्न झाला.
अंबादास टल्लू फाऊंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला.


प्रारंभी अंबादास टल्लू फाऊंडेशनच्या
अध्यक्षा अनुराधा टल्लू यांनी स्वागत केले. यानंतर
प्रास्ताविक भाषणात त्या म्हणाल्या की, “अंबादास
टल्लू फाऊंडेशन ही ‘आरोग्य- शिक्षण – पर्यावरण’ या क्षेत्रात कार्य करणारी सुप्रसिद्ध सामाजिक संस्था आहे. विविध सन्माननीय पद्म गौरव पुरस्कार विजेत्यांचा वैशिष्ट्य पूर्ण रीतीने जाहीर गौरव सत्कार सोहळा यशस्वीपणे आयोजित करणारी भारतातील एकमेव सामाजिक संस्था असून, या उपक्रमाचे हे यशस्वी सहावे वर्ष आहे .संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा टल्लू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले “अंबादास टल्लू फाउंडेशन” च्या स्थापनेची पार्श्वभूमी विशद करत त्यांनी संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्टे याबाबत माहिती दिली त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगत आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला .या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षपद माननीय पद्मभूषण डॉ. शांताराम बा मुजुमदार यांनी भूषविले. याप्रसंगी पद्म पुरस्कार प्राप्त झालेले व कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व सत्कार मूर्तींचा विभूतींचा शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी आणि संस्थेचे स्मृतीचिन्ह देऊन गौरव सत्कार करण्यात आला .विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एका पद्मविभूषण ३ व्यक्तींना पद्‌द्मभूषण व ११ व्यक्तींना पद्‌द्मश्री पुरस्कार जाहीर झाला.


विशेष बाब म्हणजे सत्कारमूर्ती पद्मश्री अमिडा फर्नांडिस यांनी आपले प्रतिनिधी डॉक्टर राजन जोशी आणि डॉक्टर संदीप कदम यांना पाठवले होते परंतु त्यांच्या माध्यमातून अमिडा मॅडमचा संघर्षमय जीवनपट मुलाखती द्वारे त्यांनी उलगडून दिला आणि सत्कारमूर्ती पद्मश्री डॉ. अशोक खाडे यांनी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना
पद्मश्री अशोक खाडे यांनी आपल्या आयुष्याची सुरूवात शून्यातून केली . त्यांच्या आयुष्यात दोनच गोष्टी प्रामुख्याने होत्या एक म्हणजे अंधार आणि दुसरं म्हणजे दारिद्र्य परंतु एकत्र कुटुंब पद्धतीत राहिल्यामुळे त्याचा त्यांना खूप पारिवारिक बळ मिळाले आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांचा परिवार म्हणजे त्यांच्या पाठीशी एक सपोर्ट सिस्टीम उभे राहिले.प्रत्यक्षात तमाशा म्हणजे सिनेमात दाखवतात तसे त्याचे रूप नसून तमाशा ही एक कला आहे. असे उद्गार पद्मश्री रघुवीर खेडेकर यांनी मुलाखतीच्या द्वारे आपला जीवनपट उलगडून दाखवताना केले
रामायणात रामाच्या मागे सीता गेली परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र मी सीतेच्या मागे येऊन आदिवासी क्षेत्रामध्ये गोरगरिबांसाठी कार्य करायला शिकलो आणि कटिबद्ध झालो असे उद्गार पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांनी आपल्या जीवन प्रवासा बद्दल मुलाखतीत सांगितले .मल्लखांब हा अस्सल मराठमोळा, पारंपारिक आणि भारतीय खेळ आहे मलखांब या खेळाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होण्याची गरज आहे ऑलिंपिकच्या नियमाप्रमाणे पाच खंडांमध्ये 75 देशांमध्ये तो खेळ खेळला जाईल तेव्हा तो ऑलिम्पिक मध्ये येण्यासाठी पात्र ठरेल आत्तापर्यंत 52 देश झालेत आणखीन मोठी मजल मारायची आहे पण संपूर्ण भारत सुदृढ भारत आणि सशक्त भारत बनण्यासाठी मलखांबाचा प्रचार प्रसार होण्याची खूप आवश्यकता आहे असे पूर्व पद्मश्री उदय देशपांडे यांनी मुलाखती द्वारे सांगितले .
चित्रपट अभिनेते आर माधवन हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असून ते अगदी सर्वसामान्य आयुष्य जगतात असे प्रतिपादन थोरांचा गौरव थोरांच्या हस्ते या कार्यक्रमात मुलाखतीद्वारे विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना त्यांनी केले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच त्यांचे जीवन मूल्य आहे असेही ते म्हणाले
पद्मविभूषण ज्येष्ठराज जोशी यांनी मुलाखतीच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ,” भारतीय जनुकांमध्ये एवढी ताकद आणि शक्ती आहे की ते कुठली गोष्ट कमीत कमी वेळ आणि उत्पादन मूल्य कमीत कमी करून कुठली गोष्ट साध्य करू शकतात करोडच्या मशिनरीच्या माध्यमातून जे साध्य होऊ शकेल त्याहीपेक्षा काही पटीने भारतीय हात आणि त्यांची बुद्धी ते साध्य करू शकतात ” असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी पीएचडी साठी प्रवृत्त केले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांपैकी एक असलेले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना 1965 च्या युद्धाच्या वेळेस देशासाठी लढताना नऊ गोळ्या शरीराला लागल्या त्यातील एक गोळी अजूनही शरीरात आहे . त्यांना आजवर चारशे बहात्तर सुवर्णपदक मिळालेले असून अर्जुन अवार्ड तसेच मिलिटरी चा लाईफ टाईम अचीवमेंट अवार्डही त्यांना मिळालेले आहे असे सांगितले .त्यांच्यावर चंदू चॅम्पियन नावाचा सिनेमाही काढलेला आहे .


समाजातील अनेक मान्यवर
कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले.
यांच्यासह कॉसमॉस बँकेचे सीएमडी व चेअरमन कोकरे सर , मिलिंद काळे , ज्योती नरळकर डॉ अनिल दूधभाते कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. डॉ. आनंद देशपांडे , उद्योजक किशोर पिंगळीकर श्री मिलिंद भंडगे श्री गिरीश वसेकर ,राम ठोकळ , श्री.सचिन टेकाळे , आरुषी दाते , ॲड संगीता कुलकर्णी , मानसी गोडबोले , डॉ प्रशांत आष्टुरकर , , दिपाली अकोलकर , वासंती कुलकर्णी, वैशाली डोणगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक पुरुष व महिला हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.रेवती सौदीकर यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रशांत मंजिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले, त्यानंतर केतकी देशपांडे यांच्या पसायदानाने महाराष्ट्रातील एकमेव अशा या उत्तुंग जाहीर गौरव सोहळ्याची सांगता यशस्वीरीत्या पार पडली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *