👁 9 Views

पुणे सोलापूर महामार्गावर अपघात, एक ठार तर दोन जखमी

 

भिगवण : पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी(ता.इंदापुर) गावच्या हद्दीत सकुंडे वस्ती येथे सेवा रस्त्यावरील गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातांमध्ये एका तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.


घटना मंगळवारी(ता.१४) रात्री बाराच्या सुमारास घडली.

धनंजय दामोदर धुमाळ(वय.२२ रा.कुंभारगाव,ता.इंदापुर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव आहे तर भारत पांडुरंग पोंद्कुले (वय २३) व किशोर दत्तात्रय घोडके(वय.२२ रा.दोघे,कुंभारगाव,ता.इंदापुर) हे अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले आहेत.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कुंभारगांव (ता.इंदापुर) येथील तरुण डाळज (ता.इंदापुर) येथील यात्रेतून दुचाकीवरुन (क्र. एम. एच. ४२ बी.ए.३८२०) वरून तक्रारवाडी येथील यात्रेनिमित्त आयोजित मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी जात असताना पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील गतिरोधकावर दुचाकी आदळून हा अपघात घडला.

अपघातांमध्ये धनंजय धुमाळ यांचे डोक्याला व मणक्याला गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार समीर करे करीत आहेत.


मागील दोन दिवसांमध्ये भिगवण व परिसरातील तीन युवकांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे या भागातील नागरिकांना धक्का बसला आहे. याबाबत योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांमधुन होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *