👁 7 Views

पंढरपूर रोटरी क्लब कडून जिल्हा परिषद शाळेला साऊंड सिस्टीम भेट

पंढरपूर: प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून कोर्टी (ता.पंढरपूर) येथील माळी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला साऊंड सिस्टीम भेट दिली असल्याची माहिती रोटरी क्लबचे सचिव सचिन भिंगे यांनी दिली.


   कोर्टी येथील माळी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला साऊंड सिस्टीमची गरज लक्षात घेऊन तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम राबविता यावेत यासाठी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून


 सोमवार दिनांक २० मार्च २०२३ रोजी रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे उपक्रमशील अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, सचिव सचिन भिंगे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक भैरू माळी, रो. डाॅ. संगिता पाटील,  रो. श्रीरंग बागल, डाॅ. सुलोचना जानकर-कोडलकर, शाळेचे मुख्याध्यापिका संपदा परळीकर, शिक्षिका पविञा कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली.


   यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *