👁 7 Views

3 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट, लग्नानंतर अंजली गावी आली आणि……

 

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील दर्याबाई उमरी या गावात ही घटना घडली आहे. अंजली थोरात आणि आकाश वाठोरै अशी मृत तरुण आणि तरुणीचे नाव आहे.


दोघांनी एकत्र विष प्राशन करून विष प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपवली आहे. अधिक माहिती अशी की, मयत अंजली थोरात आणि आकाश वाठोरै यांचे प्रेम संबंध होते. अंजली ही मूळची अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावाची रहिवाशी होती. तिच्या आईचा मृत्यू झाल्याने ती आजोळी ऊमरी दर्या येथे मामाकडेच राहत होती.

याच गावातील आकाश वाठोरे ह्याच्यासोबत तिची मैत्री झाली. पुढे चालून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही शिक्षणासाठी हदगावला ये-जा करीत होते. दोघांमध्ये 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

अंजलीच्या कुटुंबाला दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कळाली. तिच्या वडिलांनी आणि आजोबानी या संबंधाला नकार दिला. त्यानंतर अंजलीचे लग्न नात्यातील मुलासोबत लावून देण्यात आलं. लग्न झाल्यानंतरही आकाश आणि अंजलीमध्ये संवाद सुरू होता.


28 मार्च रोजी मुलगी नांदेडला आली होती. तेव्हा तिला आकाशने गाडीवर गावी आणले. पण ही माहिती आजोबाला समजली आणि त्यानी दोघांवर राग काढला. पुढे देखील आपल्या संबंधाला मान्यता मिळणार नसल्याने दोघांनी 30 मार्च रोजी विषप्राशन केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवला उशिरा प्राप्त झाल्याने आज मनाठा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *