Pandharpur live : कासेगाव येथील वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल दोघांवर कासेगाव पोलीस ठाण्यात (Kasegaon Crime) गुन्हा दाखल करण्यात आला. महादेव राजाराम पाटील व शिवाजी राजाराम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
भिमराव आनंदा पाटील, (वय ६५) वर्षे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
इस्लामपूर : कासेगाव येथील वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल दोघांवर कासेगाव पोलीस ठाण्यात (Kasegaon Crime) गुन्हा दाखल करण्यात आला. महादेव राजाराम पाटील व शिवाजी राजाराम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भिमराव आनंदा पाटील, (वय ६५) वर्षे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रशांत भिमराव पाटील (वय ३७ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कासेगाव) यांनी कासेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्रशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझे सर्व कुटुंब एकत्र राहतो. माझे वडील भिमराव आनंदा पाटील शेती करत होते. आमची शेती कासेगांव गट नं.१५६० मध्ये आहे. कृष्णा नदी लगत शेतात हत्तीगवत आहे. ओढ्याच्या पलीकडे गट नं १२८१ मध्ये माझे मालकीची दीड एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस पीक आहे.
सदर शेत जमीनी लगत महादेव राजाराम पाटील व शिवाजी राजाराम पाटील यांच्यात शेतजमीनीचे कारणावरुन वाद होते. माझे वडील २ एप्रिल रोजी दुपारी नेहमीप्रमाणे शेतात व म्हसोबाच्या दर्शनासाठी गेले होते. दुपारी साडे चारच्या सुमारास आमचा शेतगडी माणिक दगडु चांदणे (रा. कासेगांव) याने माझे मोबाईलवर फोन करून कळविले. दोन्ही हातापायावर मानेच्या मागे, चेह-यावर डावे बाजुस भाजले होते. तेथे झाडेझुडपे आजुबाजुचे गवत पेटले होते.
यावेळी महादेव राजाराम पाटील यांचे हातात काठी व शिवाजी राजाराम पाटील यांचे हातात खुरपे होते. मी त्या दोघांना “आग कशी काय लागली” असे विचारले त्यावेळी त्यांनी मला “विजेची तार पडून आग लागली” असल्याचे सांगितले. मी त्याना दोघांना “माझे वडील कसे काय भाजले” असे विचारले असता त्यांनी माझे वडील जळत्या गवतात पडुन भाजलेचे सागितले. त्यांना कोणीतरी वस्तीवर आणून सोडले. यावेळी शिवाजी व महादेव यांच्यावर संशय आल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दिली.

