👁 8 Views

मुलगी बापावर गेली म्हणुन आईने चिरला 3 महिन्याच्या चिमुकलीचा गळा

 

नाशिक : पती आणि सासूकडेच चार महिन्यांची मुलगी आनंदात राहत असल्याने आणि परिसरातील नागरिक व नातेवाईक मुलगी वडिलांसारखीच दिसत असल्याचे म्हणू लागल्याने नैराश्यग्रस्त अवस्थेत आईनेच मुलीचा चाकून गळा चिरल्याची घटना पोलीस तपासात धक्कादायक उघडकीस आली आहे.


शिवाय, अनोळखी महिलेने आईला बेशुद्ध करून मुलीचा गळा चिरून खून केल्याचा बनाव रचल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. दृवांशी भूषण रोकडे (वय ४) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. युक्ता भूषण रोकडे (वय २४) असे अटक केलेल्या आईचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व दीर राजेंद्र किसन सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार, ध्रुवनगरमधील भूषण रोकडे व युक्ता भूषण रोकडे वास्तव्यास आहेत. ते सातपूरमधील एका कंपनीत सुपरवायझर आहेत. ते सोमवारी (दि.२०) कामावर असताना त्यांच्या घरी त्यांची आई आणि पत्नी दोघी होत्या. सायंकाळी ७ वाजेदरम्यान रोकडे यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी घरात रोकडे यांची पत्नी युक्ता व मुलगी होती. घरात कुणी नसल्याची संधी साधत एक महिला घरात घुसली. तिने युक्ताच्या नाकाला रुमाल लावला. बेशुद्ध झाल्यानंतर तिने पलंगावर झोपलेल्या धृवांशीचा गळा चिरला. त्यानंतर अनोळखी महिला घरातून बाहेर गेली. रोकडेंची आई घरी आली असता त्यांना सून बेशुद्ध व धृवांशी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. नागरिकांनी मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत धृवांशीला मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.


युक्ताला पोलिसांनी विश्वासत घेऊन मंगळवारी (दि.२१) संध्याकाळी तपास सुरू केला. पोलीस चौकशीत तिने मुलीचा खून केल्याची कबुली दिली. दृवांशी वडील आणि सासूकडे सातत्याने जात असे. त्यांच्याकडे ती आनंदात रहायची. शिवाय, परिसरातील नागरिक व नातेवाईक नेहमीच युक्ताला मुलगी वडिलांवरतीच गेली आहे, वडिलांसारखीच दिसते, असे सांगायचे. त्यातून युक्ता नैराश्यात गेली होती. सातत्याने तोच विचार करू लागल्यामुळे तिने मुलीचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *