👁 5 Views

Pandharpur | ‘कर्मयोगी’ मध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

Pandharpur Live News | माजी विद्यार्थ्यानी कॉर्पोरेट क्षेत्रामधील असलेला अनुभव, उपलब्ध असणारी संधी तसेच त्यासाठी योग्य दिशेने करावी लागणारी मेहनत यासाठीचे मार्गदर्शन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना करून महाविद्यालय तसेच समजाप्रती आपली असणारी महत्वाची भूमिका पार पाडावी असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले. श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथे आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. 

कर्मयोगीच्या मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाने आयोजित केलेल्या या मेळाव्यामध्ये सुमारे ४५ माजी विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आली. मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. राहुल पांचाळ यांनी कॉलेजचा व मेकॅनिकल विभागाचा प्रगतीचा आढावा माजी विद्यार्थ्यांसमोर मांडला.


 कर्मयोगीच्या मेकॅनिकल विभागातून शिक्षण पूर्ण केलेले अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. तसेच काही परदेशामद्धे यशस्वी अभियंते म्हणून नावलौकिक मिळविला आहे. तसेच अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजग म्हणून कार्यरत आहेत. अश्या सर्व विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून किसन सलगर उपस्थित होते. 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन शिंदे यांनी केले. मेकॅनिकल विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *